Nagpur Corona : खासगी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur school 38 students test Covid-19 positive Maharashtra

Nagpur Corona : खासगी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

Nagpur Corona : महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा हाहाकार दिसत आहे. नागपूर शहरातून विशेष म्हणजे धोक्याची घंटा वाजली आहे. नागपूरमध्ये एका खासगी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. (Nagpur school 38 students test Covid-19 positive Maharashtra)

दिवसभरात 262 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्गाचा वाढता वेग पाहता प्रशासन कामाला लागलं आहे तर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना बाधितांची संख्या नागपुरात वाढत चाललेली दिसून येते आहे. रविवारी शहरात तब्बल 262 जण कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये जयताळा भागातील राय इंग्लिश स्कूलमधील 38 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशीनी ही माहिती दिली. 15 जुलैला शाळेतील मुलांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आणि त्यांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला असे जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा: Corona : आज राज्यात 2186 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात 24 तासात 2,186 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 2,179 बरे झाले आणि 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आढळले आहेत आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 276 रुग्णांची भर पडली आहे.

Web Title: Nagpur School 38 Students Test Covid 19 Positive Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..