
नागपूर : घटना घडली तेव्हा सकाळचे साडेनऊ वाजले होते. अशात पहाटेची थंडी होतीच. त्यामुळे, घटनास्थळ असलेल्या देवळी पेंढरी शिवारात अगदी तुरळत वाहने होती. उलटलेल्या बसच्या आतमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढायचे काम चौदा-पंधरा वर्षांच्या कोवळ्या पण तितक्याच धीट विद्यार्थ्यांनी हाती घेतले. नव्हे, भेदरलेल्या मित्रांना आलिंगन देत मायेची उब दिली.