नागपूर : शंकरनगर चौकातील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन निघालेली खासगी बस उलटून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ५२ विद्यार्थी, एक शिक्षिका, शारीरिक शिक्षक व काळजीवाहक असे एकूण ५५ प्रवासी होते. .निर्वाणी शिलानंद बागडे (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. बसमधील सर्वांनाच दुखापत झाली असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेत बसचालकही जखमी असून, सर्वांवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास हिंगणा ते कवडस मार्गावरील देवळी पेंढरी शिवारात ही दुर्दैवी घटना घडली.शाळेतील इयत्ता दहावीच्या पाच तुकड्यांमधील विद्यार्थ्यांची सहल वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या अंजी गावातील ज्ञान भारती स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे जात होती. या ठिकाणी ट्रॅकिंगसह अन्य साहसी खेळांच्या प्रशिक्षणाची सोय आहे. ठरल्याप्रमाणे सर्व विद्यार्थी सहा वेगवेगळ्या बसमधून रवाना झाले. .मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकच बसमध्ये तीन शिक्षक-शिक्षिकांची उपस्थिती होती. सहा बसमध्ये ३३५ विद्यार्थी, ०९ शिक्षक, एचआरए हायकर्सचे ०६ स्वयंसेवक, सहा क्लीनर होते. अपघातग्रस्त बसचे नेतृत्व अर्चना राव या शिक्षिकेकडे होते. मुले नाचत गात जात असताना वळणावर बस अनियंत्रित होऊन सुमारे १० फूट खोल असलेल्या भागात उलटली. यामुळे बसमधील बहुतेक सर्वांनाच दुखापत झाली. अपघातात मृत्यू झालेली निर्वाणी मूळची मोहगाव झिल्पी येथील रहिवासी असून सध्या सीम टाकळी येथे वास्तव्यास होती. सरस्वती विद्या मंदिरची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होती..मदतीसाठी सरसावले अनेक हातघटनेनंतर दुखापत झालेले विद्यार्थीच एकमेकांच्या मदतीला धावले. सीटमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. हे दृष्य बघून या मार्गाने जाणारे वाहनचालकही मदतीसाठी सरसावले. मिळेल त्या वाहनातून सर्वांनाच एम्स रुग्णालयात पाठविण्यात आले. कोणतीही कुरबूर न करता अनेकांनी मदत केली. हिंगणा पोलिसांचा ताफाही घटनास्थळी दाखल झाला. सकाळी १०.३० पर्यंत बहुतेक सर्व विद्यार्थी एम्समध्ये पोहोचले होते. प्रकृती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना तपासणीसाठी नेण्यात आले. दुखापतीची खात्री करून विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले..जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची विचारपूसघटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर एम्स रुग्णालयात पोहोचले. त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या उपचारासंदर्भात माहिती जाणून घेतली. सोबतच विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला. मृत मुलीच्या पालकांना योजनेतून भरपाई मिळवून द्यावी, सोबतच जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करावेत, असे निर्देश दिले. तसेच निधीची चिंता न करता गरजेनुसार अन्य हेडचा निधी खर्च करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली..एम्सच्या डॉक्टरांकडून उपचारास जलद प्रतिसादअपघातात सर्वाधिक दुखापत निर्वाणीलाच झाली होती. रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिची हालचाल थांबली होती. यानंतरही डॉक्टरांनी प्रयत्न केले होते. अखेर तिला मृत घोषित करण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या ब्लॅडरला दुखापत झाल्याने त्याला शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. एका मुलाच्या मानेलाही गंभीर दुखापत झाली होती. इतरांचे हात, पाय, डोक्याला जखम झाली. विद्यार्थ्यांची अवस्था लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने उपचारासाठी घेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पालकही एम्समध्ये पोहोचू लागले. पालकांच्या इच्छेनुसार सात विद्यार्थ्यांना निम्स हॉस्पिटल तर एका विद्यार्थ्याला प्लॅटिना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. बसचालक प्रमोद सुनिल गौरखेडे(वय ३०) याच्यावर निम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकांना योग्य माहिती देण्यासाठी एम्स रुग्णालयात हेल्पडेस्क सुरू करण्यात आला..वेगाने केला घातसहलीच्या आयोजनात वेगवेगळ्या संस्था सहभागी आहेत. एचआरएस हायकर पिकनिक कंपनीने शाळेसोबत सहल आयोजनासंदर्भात बोलणी केली. शाळेने सहमती दर्शविली. कंपनीने बसेस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गोपाल झरिया यांच्याकडे दिली. हरिहर टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली ही बस वैभव वाकडे यांच्या मालकीची आहे. शाळेपासून सर्व बसेस एका मागोमाग निघाल्या. मात्र, अपघातग्रस्त बस काहीशी मागे राहिली. यामुळे चालकाने वेग वाढविला होता. त्यामुळेच वळणावर आल्यानंतर बस उलटल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले..घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाशी संबंध असणाऱ्या प्रत्येकाचीच बारकाईने चौकशी केली जाईल. विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळावेत याला प्राथमिकता आहे. सर्वच विद्यार्थी व शिक्षकही धोक्याबाहेर आहेत.- लोहित मतानी, पोलिस उपायुक्त..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.