Nagpur : लिटिल वूड्समध्ये देशी-विदेशी पक्षांची शाळा !

किलबिलाटाने होते पहाट नागरिकांचीही वाढली वर्दळ
 देशी-विदेशी पक्षांची शाळा
देशी-विदेशी पक्षांची शाळाsakal

नागपूर : महामेट्रोने वासुदेवनगर मेट्रो स्टेशनजवळ तयार केलेले लिटिल वूड वन आता पक्षांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. येथे पहाटेपासून देशी-विदेशी पक्षांचा किलबिलाट असतो. तसेच रंगबिरंगी पक्षांमुळे लिटिल वूडकडे नागरिकांचा ओढा वाढला असून योगासने, व्यायामासाठी गर्दी होत आहे. दररोज सायबेरियन पक्षांचे थवेही नागरिकांसाठी पर्वणीच ठरत आहे.

हिंगणा मार्गावरील मेट्रोचे काम सुरू असताना अंबाझरी तलावाच्या काठावर महामेट्रोने लिटिल वूड नावाने वन तयार केले. विविध फुले, फळांची तसेच सावली देणारी झाडे येथे लावली होती. आता लिटिल वूड आणखी आकर्षक झाले असून पक्षांच्या थव्यांमुळे नागरिकही या वनाच्या प्रेमात पडले आहे. आजूबाजूला रहिवासी क्षेत्र असल्याने या परिसरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी

लिटिल वूड्समध्ये भरते देशी-विदेशी पक्षांची शाळा !

लिटिल वूड चांगलेच पर्यटन स्थळ झाले आहे. हिंगणा मार्गावरून ये-जा करणारेही पक्षी पाहण्यासाठी येथे उत्सुकतेने थांबत असल्याचे येथील कर्मचाऱ्याने नमूद केले.

पहाटेपासून पक्षांचा किलबिलाट सुरू होतो, पक्षांच्या आवाजानेच अनेकांची सकाळ होत असल्याचे येथे फिरायला येणारे स्वावलंबीनगरातील समीर गावंडे यांनी सांगितले. सकाळी लिटिल वूडमध्ये फिरल्याने फ्रेश वाटते. अंबाझरी तलावातील थंड वारा आणि पक्ष्यांचा आवाज यामुळे मोठा दिलासा मिळतो. दिवसभर उत्साह आणि ऊर्जा असते.

नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अतिशय उत्तम व्यवस्था महामेट्रोने केल्याचेही ते म्हणाले. सायंकाळीही अनेकजण फिरायला येतात. याच परिसरात सायकल ट्रॅक तयार झाल्याने मुले, मुली फिरायला येतात. महिला योगा, व्यायाम करताना दिसतात.

निःशुल्क प्रवेश

लिटिल वूडमध्ये कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. महामेट्रोने येथे पर्यावरण पोषक कडुलिंब, बाभूळ, कांजी, सुबूल, चंदन, रक्तचंदन, रुद्राक्ष आंबा, पेरू आदी विविध प्रकारची फलदायी, फुलांची झाडे लावली. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत कापण्यात आलेल्या एका झाडाच्या मोबदल्यात पंधरा झाडे महामेट्रोने लावली. आता ही झाडे वाढली असून वन तयार झाले. येथे चोविस तास सुरक्षा रक्षकही आहेत.

मोरांनी लावले वेड

लिटिल वुडमध्ये पहाटे चालणाऱ्यांना अनेकदा डौलात फिरणारे मोर दिसतात. मोरांच्या थव्याने नागरिकांना वेड लावले आहे. काही दिवसांपूर्वी येथे बिबट्याही दिसला होता. अंबाझरी तलावातील मुबलक पाणी व वाढलेल्या वनामुळे या परिसरात आता वन्यप्राणीही नागरिकांना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com