

Nagpur News
esakal
नागपूर: एका बाजूला उन्हाळ्याच्या सुट्यांचे वेध लागले असतानाच, दुसरीकडे जागतिक युद्धाची झळ आता थेट सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम मुलांच्या शालेय गणवेशावर होणार आहे. कच्चा माल, इंधन आणि गॅसच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने गणवेशाच्या किमतीत ३० ते ३५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडून जाणार आहे.