Nagpur Weather : नागपूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके ; तापमानात चार अंशांनी वाढ
Nagpur News : ढगाळ हवामानामुळे दोन दिवस थोडासा दिलासा मिळाल्यानंतर सोमवारी नागपूरसह विदर्भात उन्हाचा भडका उडाला. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली.
नागपूर : ढगाळ वातावरणामुळे दोन दिवस उन्हाच्या चटक्यांपासून तात्पुरता दिलासा मिळाल्यानंतर सोमवारी पुन्हा सूर्य तापला. त्यामुळे विदर्भातील कमाल तापमानात चार अंशांपर्यंत वाढ झाली.