Coconut Ganesh : नागपुरात अनोखा बाप्पा! तब्बल 3,000 नारळांपासून साकारली 12 फूट उंच गणेश मूर्ती; पाहा व्हिडिओ

Nagpur Ganesh Murti : नागपुरातील या इको-फ्रेंडली गणेश मूर्तीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.
Nagpur Coconut Ganesh
Nagpur Coconut GanesheSakal

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. कित्येक ठिकाणी पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचा प्रयत्न लोक करताना दिसत आहेत. नागपुरातील अशाच एका अनोख्या गणेश मूर्तीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. याला कारण म्हणजे, ही मूर्ती चक्क तीन हजार नारळांचा वापर करून बनवली आहे.

20 दिवसांची मेहनत

ही मूर्ती तब्बल 12 फूट उंच आणि 10 फूट लांब आहे. परळी वैजनाथ मंदिर ट्रस्टकडून ही मूर्ती बनवण्यात आली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी 20 दिवस लागले. यासाठी मूर्तिकारांना 24 तास काम करावं लागलं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मूर्तिकारांनी याबाबत माहिती दिली.

ही मूर्ती बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नारळांचा वापर करण्यात आला. काही ठिकाणी मोठे, तर काही ठिकाणी छोटे नारळ वापरले आहेत. काही ठिकाणी नारळाच्या कवटींचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, या मूर्तीचे डोळेदेखील नारळापासून तयार केले आहेत.

Nagpur Coconut Ganesh
Ganeshotsav 2023 : काजू, बदाम, चॉकलेटमध्ये सजला बाप्पा! मूर्ती बुकिंगनंतर वर्क करण्यावर भक्तांचा कल

प्रसादाच्या नारळांचा वापर

ही मूर्ती बनवण्यासाठी भारतातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात अर्पण केलेल्या नारळांचा देखील वापर करण्यात आला आहे. पर्यावरणाचा विचार करून ही इको-फ्रेंडली मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती तयार केल्यानंतर परळीला रवाना करण्यात आली आहे.

नागपूरचं चितारोळी मार्केट

नागपूरचं चितारोळी मार्केट हे गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्ती केवळ देशातच नाही, तर विदेशातही जातात. या बाजारात 5 इंचाच्या गणेश मूर्तीपासून तब्बल 21 फुटांची मूर्ती देखील तयार होते.

Nagpur Coconut Ganesh
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराखाली आढळले पुरातन अवशेष; कित्येक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com