Nagpur: पन्नास हजारांवर नागरिकांची दुसऱ्या डोससाठी टाळाटाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

नागपूर : पन्नास हजारांवर नागरिकांची दुसऱ्या डोससाठी टाळाटाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाने पुन्हा डोके वर काढू नये म्हणून प्रशासन प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र, सुस्तावले आहेत. शहरातील ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी अद्यापही दुसरा डोस घेतला नसल्याने महापालिकेचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतरही दुसरा डोस न घेणाऱ्या या नागरिकांचा महापालिका शोध घेणार आहे. तसेच पावणे तीन लाख नागरिकांनी तर पहिलाही डोस घेतलेला नाही.

दोन लसीकरणातील कालावधीची मुदत संपुष्टात येऊन अनेक महिने लोटल्यानंतरही दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या पन्नास हजारावर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या नागरिकांना ३० नोव्हेंबरपर्यंत महापालिकेच्या १६० केंद्रावरून पहिला डोस मोफत घेण्याची संधी आहे. येत्या १ डिसेंबरपासून महापालिका पहिल्या डोसची सुविधा बंद करणार आहे. त्यामुळे नागरिकांना १ डिसेंबरपासून खासगी रुग्णालयात पैसे खर्च करून लस घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

त्यातच आता पहिला डोस घेऊन ८४ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही अंदाजे पन्नास हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या नागरिकांमुळे संपूर्ण लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. या नागरिकांबाबतही आता महापालिका गंभीर झाली आहे. पहिला डोस घेताना या नागरिकांचा मोबाईल क्रमांक महापालिकेकडे नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना मोबाईलवरून संपर्क करून दुसरा डोस घेण्याबाबत

स्मरण करून देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यासाठीही विशेष मोहीम राबविण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले आहे.

आजपर्यंत झालेले लसीकरण

लसीकरणास पात्र नागरिकांची संख्या

१९ लाख ७३ हजार

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या

१७ लाख १ हजार ६३४

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या

९ लाख ६८ हजार ३०८

दुसरा डोस घेण्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही डोस न घेणारे जवळपास ५० हजारांवर आहे. पहिल्या डोसदरम्यान त्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध त्यांना त्यावर संपर्क करण्यात येईल.

- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त.

loading image
go to top