
नागपूर : भारत-इंग्लंड एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याची घटिका जसजशी जवळ येत आहे, तसतशी नागपूरकर फॅन्सची उत्सुकता वाढत आहे. उद्या गुरुवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडिअमवर होणाऱ्या या सामन्याच्या पूर्वसंध्येवर शहरातील वातावरण क्रिकेटमय झाले असून, क्रिकेटचा ‘फिव्हर’ शिगेला पोहोचला आहे. सामना सुखरूप व शांततेत पार पाडण्यासाठी व्हीसीएसह पोलिस व मनपा प्रशासनही सज्ज झाले आहेत.