

Police investigate the accident site in Nagpur after a fatal Bullet bike stunt involving kabaddi players.
Sakal
नागपूर: रस्ता ओलांडणाऱ्या तीन मुलींना पाहून बुलेटवर स्टंटबाजी करताना एका मुलीला वाहनाचा धक्का लागला. त्यामुळे नियंत्रण सुटून बुलेट फुटपाथवरील सिमेंटच्या दहा खांबांना धडकली. यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसऱ्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तरुणीही जखमी झाली. ही घटना सोमवारी रात्री १० च्या सुमारास काचीपुरा ते बजाजनगर चौक रस्त्यावर घडली. विशेष म्हणजे मृत दोघेही राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू होते. युग विशाल चणकापुरे (वय १९) आणि रुद्र शशिकांत सोमकुंवर (वय १९, दोन्ही रा. काचीपुरा) अशी मृतांची नावे आहेत.