Crime
sakal
Ajni & Gittikhadan Crime Over Money Dispute : नागपूर : उधारीच्या पैशाच्या वादातून शहरात दोन ठिकाणी तरुणांवर घातक शस्त्राने हल्ला करून खून केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. गिट्टीखदान आणि अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागपूर शहर हादरून गेले. या प्रकरणात अजनी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले असून, गिट्टीखदान पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.