
नागपूर : गत तीन वर्षांपासून शाळेत न गेलेली आणि घराच्या अंगणातही न फिरलेल्या दोन निरागस बालकांची अखेर बाल संरक्षण पथक आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि पोलिसांनी सुटका केली. हा संपूर्ण प्रकार वाडी परिसरातील लावा दाभा गावातील आहे. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आईने दोन्ही मुलांना घरात डांबून ठेवले होते.