Nagpur Crime : झोपेत असलेल्या पत्नीवर केला चाकूने हल्ला
Domestic Violence : नागपूरमधील जुना बगडगंज येथे सोमवारी पहाटे पतीने आपल्या झोपेत असलेल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला आणि तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
नागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर चाकूने हल्ला करीत, तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना सोमवारी (ता.१७) पहाटे चार वाजताच्या सुमारास जुना बगडगंज येथे उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.