Nagpur Crime : १५ वर्षांच्या संसाराचा हिंसक शेवट; नाक-तोंड दाबून पत्नीचा खून
Crime News : नागपूरमध्ये पतीचे अनैतिक संबंध उघड झाल्याने पतीने पत्नीचा नाक-तोंड दाबून खून केला. सुरुवातीला अपघाती मृत्यू समजली गेलेली घटना पोस्टमार्टम अहवालानंतर हत्येच्या स्वरूपात पुढे आली.
नागपूर : पतीचे अनैतिक संबंध माहिती पडल्याने पतीने पत्नीचे नाक आणि तोंड दाबून तिला ठार केले. ही घटना २१ मे रोजी उघडकीस आली. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यावर तपासानंतर पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.