
नागपूर : राज्यासह देशात प्रियकराच्या मदतीने पतीच्या खून केल्याच्या घटना घडत असताना, नागपुरातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने नाकतोंड दाबून खून केला. ही घटना रविवारी (ता.५) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकर या दोघांनाही अटक करण्यात आली.