
नागपूर : आजच्या काळात बहुतांश तरुण-तरुणी तंत्रज्ञान व इंटरनेटच्या दुनियेत हरवलेले दिसतात. ते आपला बहुतांश वेळ मोबाईलवर घालवून स्वतःचे करिअर धुळीस मिळवतात. पण, नागपूरच्या दीपाली व अंजली या राठोड भगिनींनी वेगळी वाट निवडत चक्क घराच्या छतावरच नैसर्गिक शेती फुलवून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी केलेला ‘टेरेस गार्डनिंग’चा यशस्वी प्रयोग तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.