Journalist Fraud: जमीन व्यवहाराची बातमी छापण्याची धमकी देत उकळले लाखो, यू-ट्यूब पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल

शेती आणि प्लॉट परस्पर नावावर केल्याप्रकरणाची बातमी छापण्याची धमकी देत, पावणेपाच लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या एका यूट्यूब पत्रकाराविरोधात सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur
Nagpur Esakal
Updated on

Fake Journalist fraud: शेती आणि प्लॉट परस्पर नावावर केल्याप्रकरणाची बातमी छापण्याची धमकी देत, पावणेपाच लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या एका यूट्यूब पत्रकाराविरोधात सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विवेक विठ्ठलराव धारट (वय ३५, रा. नक्षत्र कॉलोनी, सावनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक विठ्ठलराव धारट यांची मौजा दहेगाव येथे वडीलोपार्जीत शेती व प्लॉट आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या आत्याने एकटीच वारसदार असल्याचे सांगून शेती आणि प्लॉट हे परस्पर आपल्या नावावर करून घेतले होते. याबाबत त्यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान ही बातमी दाखविण्याकरिता धारट या पत्रकाराकडे गेले.

तिथे पत्रकाराने त्याची सिटीसर्वे कार्यालयात ओळख असल्याचे सांगून मी तुमचे काम करून देईल अशी बतावणी केली. त्यासाठी त्याने वकील व इतर खर्चासाठी पाच लाख रुपयाची मागणी केली. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून विवेक यांनी त्याला ४ लाख ७० हजार ‘गुगल पे’वर दिले. मात्र, त्याने पाच महिने झाल्यावरही काम न केल्याने त्यांनी सीताबर्डी येथे तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी सीताबर्ड पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Nagpur
Adhalrao Patil: ठरलं! आढळराव पाटील 26 मार्चला राष्ट्रवादीत करणार प्रवेश; शिरुरमध्ये होणार थेट लढत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com