Nagpur News: ११ व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय मजूर ठार; सुरक्षा साधनांअभावी मृत्यू?
Nagpur Construction Accident: नागपूरच्या सोनेगाव भागात निर्माणाधीन इमारतीवरून पडून २० वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचा आरोप करत ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
नागपूर : सोनेगाव भागात निर्माणाधीन इमारतीवरून पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस ३० जानेवारीला घडली. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोनेगाव पोलिसांनी दाखल केला.