
नागपूर : जवळपास तीन रात्र, दोन दिवस असे तब्बल ६० तास सलग बरसलेल्या संततधार तसेच मुसळधार पावसाने अख्खी उपराजधानी जलमय झाली. पावसामुळे शहरातील रस्ते, वस्त्या, झोपडपट्ट्या, उद्याने व खेळाच्या मैदानांसह नदी- नालेही तुडुंब भरले. कुठे गुडघ्यापर्यंत, तर कुठे कंबरेपर्यंत पाणी तुंबल्याने जागोजागी वाहतूक कोंडी झाली.