Tadoba Booking Fraud: ताडोबा जंगल सफारी बुकिंग घोटाळा प्रकरण, ठाकूर बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला, १२ कोटींचा गैरव्यवहार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही ताडोबा जंगल सफारी बुकिंगमध्ये १२ कोटींचा गैरव्यवहार करणाऱ्या ठाकूर बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
Tadoba Booking Fraud: ताडोबा जंगल सफारी बुकिंग घोटाळा प्रकरण, ठाकूर बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला, १२ कोटींचा गैरव्यवहार

Tadoba Sancturary Safari Booking Fraud: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही ताडोबा जंगल सफारी बुकिंगमध्ये १२ कोटींचा गैरव्यवहार करणाऱ्या ठाकूर बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

अभिषेक आणि रोहितकुमार विनोद सिंग ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. ताडोबा जंगल सफारी बुक करणारी कंपनी वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्सचे ते भागीदार आहे. विभागीय वनाधिकारी यांच्या तक्रारीवरून चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ताडोबा-अंधारी टायगर कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनने जंगल सफारींच्या ऑनलाइन बुकिंगसाठी १० डिसेंबर २०२१ रोजी वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्ससोबत करार केला. परंतु सोल्युशन्सने करारातील अटींचा भंग करून जंगल सफारी बुकिंगसाठी १२ कोटी १५ लाख ५० हजार ८३१ रुपये वनविभागाकडे भरले नाहीत. बुकिंगबाबत आवश्यक पुरावेही सादर करण्यात आले नाहीत. या फसवणुकीमुळे सोल्युशन्स सोबतचा करार रद्द करण्यात आला. (Latest Marathi News)


याप्रकरणी ठाकूर बंधूंनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. आरोपींच्या जामीन अर्जाला राज्य सरकार आणि वनविभागाने कडाडून विरोध केला होता. आरोपींनी वैयक्तिक व्यवसायासाठी ताडोबा जंगल सफारीचा वापर केला. त्यांनी या प्रकरणाच्या तपासात सहकार्य केले नाही.

Tadoba Booking Fraud: ताडोबा जंगल सफारी बुकिंग घोटाळा प्रकरण, ठाकूर बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला, १२ कोटींचा गैरव्यवहार
Farmers Protest : ...तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार MSP गॅरंटी; राहुल गांधींची मोठी घोषणा

बुकिंग डेटा प्रदान केलेला नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी डेटा नष्ट करण्यात आला. आरोपींनी विविध बँकांमध्ये २७ खाती उघडून त्यामध्ये पैसे ट्रान्स्फर केले. सरकारला जीएसटी भरला नाही. याशिवाय ३३४ जिप्सी मालक आणि ३३४ गाईडचे शुल्कही भरलेले नाही. (Latest Marathi News)

त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका मांडताना आरोपींना अटक करणे आवश्यक असल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाने या आधारावर ठाकूर बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर ठाकूर बंधूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण सर्वोच्च न्यायालयानेही ठाकूर बंधूंना दिलासा देण्यास नकार देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Tadoba Booking Fraud: ताडोबा जंगल सफारी बुकिंग घोटाळा प्रकरण, ठाकूर बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला, १२ कोटींचा गैरव्यवहार
Ashok Chavan Join BJP: राज्यसभा की नांदेडमधून लोकसभा? अशोक चव्हाणांची भाजपशी कोणती डिल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com