
अश्विनी देशकर
नागपूर : धंतोली परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय क्रिश गुजरचं घर म्हणजे जणू एक छोटंसं जंगलच. पण इथे वावरतो जॅक नावाचा श्वान, चॅरमेंडर नावाचा लाल आणि मुफासा नावाचा हिरवा इग्वाना, झुलता टॅरंट्युला कोळी, तर शांतपणे नजर टाकणारा एक साप.... हे सगळं कुठल्या चित्रपटाचा भाग नाही, तर क्रिशच्या छंदाचं प्रत्यक्ष रूप आहे. हे प्राणी त्याचे जीवलग मित्रच आहेत.