cold
sakal
नागपूर
Nagpur Temperature : नागपूरचे तापमान ४.२ अंशांनी घसरले; भंडारा किमान १० अंशांवर
विदर्भात थंडीने पुन्हा एकदा जोर पकडण्यास सुरुवात केली असून नागपुरात तापमान तब्बल ४.२ अंशांनी घसरले.
नागपूर - विदर्भात थंडीने पुन्हा एकदा जोर पकडण्यास सुरुवात केली असून नागपुरात तापमान तब्बल ४.२ अंशांनी घसरले. अचानक वाढलेल्या गारव्यामुळे सकाळ आणि रात्री थंडीची तीव्रता जाणवत आहे. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
