Nagpur News: जामठ्याजवळ रेल्वेच्या धडकेत दीड वर्षाच्या वाघाचा मृत्यू
Railway Accident: नागपूरजवळील बुटीबोरी रेल्वेमार्गावर दीड वर्षाचा वाघ रेल्वेच्या धडकेत मृतावस्थेत आढळला. वनविभागाने शवविच्छेदन केले व संवेदनशील मार्गांवर पूर्वसूचना प्रणाली बसविण्याचे काम सुरू केले आहे.
नागपूर : शहरापासून काही किलोमीटर अंतरावर रेल्वेच्या धडकेत दीड वर्षाच्या वाघाचा मृत्यू झाला. जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान आणि ब्रह्मकुमारी आश्रम परिसरालगत असलेल्या रेल्वे रुळांवर हा वाघ मंगळवारी रात्री मृतावस्थेत आढळला.