Mock Drill : आजपासून मॉक ड्रिल, ब्लॅकआऊट; नागपूर शहर पोलिस आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती,प्रशासन सज्ज, नागरिकांनी घाबरू नये
Nagpur Alert : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात आजपासून मॉक ड्रिल आणि ब्लॅकआऊट करण्यात येणार असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही माहिती दिली.
नागपूर : भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात उद्यापासून (ता. ११) मॉक ड्रिल आणि ब्लॅकआऊट केला जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करणे, आपात स्थितीत सज्जता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.