
नागपूर : शहरातील ‘आपली बस'' च्या पायाभूत सुविधा आणि दुरवस्थेवर ‘सकाळ''ने मालिका प्रकाशित केल्यानंतर महानगर पालिका सतर्क झाली. मनपा प्रशासन ‘आपली बस'' परिवहन विभाग खडबडून जागे झाल्यानंतर विविध सुविधा देण्यासाठी पुढे आले. आता केंद्र शासनाच्या पी.एम. ई-बस योजनेद्वारे शहराला लवकरच १५० बसगाड्या मिळणार आहेत.