Nagpur News: नव्या नागपूरला मिळणार तिसऱ्या रिंग रोडची जोड; ३६ गावांतील सुमारे ८८० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण
Ring Road Project: नव्या नागपूरसाठी तिसऱ्या रिंग रोडचे नियोजन सुरू असून ३६ गावांमधील ८८० हेक्टर जमीन अधिग्रहित होणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार व विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
नागपूर : मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) किंवा गुडगाव येथील व्यावसायिक, आर्थिक केंद्राप्रमाणेच प्रस्तावित ‘नवीन नागपूर’चा विकास होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला लवकरच राज्य मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नल मिळणार आहे.