
नागपूर : शहरातील दहाही झोनमध्ये ‘मोहल्ला क्लिनिक’ संकल्पना राबविण्याचा मनपाचा मानस आहे. बऱ्याच ठिकाणी मोहल्ला क्लिनिक सुरू असून, त्याचा लाभ नागरिक घेत आहेत. काही ठिकाणी आगामी काळात हे क्लिनिक सुरू होतील. या माध्यमातून पावसाळ्याच्या दिवसांत साथरोगांवर नक्कीच नियंत्रण मिळविता येईल, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.