
नागपूर : शहराची लोकसंख्या ४० लाखांवर असून, त्यात अर्धा वाटा महिलांचा आहे. अनेक महिला कामानिमित्त अथवा बाजारासाठी बाहेर पडतात. मात्र, त्यांच्यासाठी राज्याची उपराजधानी म्हणून मिरवणाऱ्या शहरात पुरेशी प्रसाधनगृहेच नाहीत. अगदी महिलांच्या संख्येच्या तुलनेत १ टक्काही सुविधा नसल्याचे वास्तव आहे. प्रसाधनगृहे तयार उभारण्यासाठी अनेक सामाजिक संघटना तयार असताना स्थानिक नागरिकांकडून विरोध होतो, हाच मोठा अडसर ठरत आहे.