

Totladoh reservoir, a key water source for Nagpur, has recorded a sharp decline in water storage.
esakal
नागपूर, : शहराची तहान भागविणाऱ्या तोतलाडोह जलाशयातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. रोज जवळपास एक टक्का जलस्तर खाली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भविष्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन धरणातील जलसाठा आणखी तळाला जाणार आहे.