Nagpur : महामार्गावर धूर सोडणारी वाहने सुसाट ; वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष

महामार्गावर शेकडो गाड्या पीयूसीविना धावत आहेत
PUC
PUCsakal

रनाळा : महामार्गावर शेकडो गाड्या पीयूसीविना धावत आहेत. त्यांच्यातील वायू प्रदूषणामुळे महामार्गाशेजारी राहणाऱ्यांना त्रास होत असून विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे. कामठी येथून जाणारे वाहन धूर सोडत असून बऱ्याचदा गाडी चालविताना तो धूर नाकातोंडात जातो. याकडे वाहतूक पोलिसही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

योग्य काळजी व दुरुस्तीअभावी प्रदूषण करणाऱ्या वाहनांना सहज फिटनेस सर्टिफिकेट मिळते, त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या अशा नादुरुस्त वाहनांमुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होत आहे. अशा वाहनांसाठी नियम बनवले आहेत, मात्र याबाबत फारसे कोणी गंभीर नाही. त्यामुळे बाहेरून आकर्षक दिसणारी वाहने रस्त्यावर धावताना काळा धूर सोडत आहेत. या वाहनांमुळे हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.

या वायू प्रदूषणाचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अनेकांना दमा, श्वसनाचे आजार अशा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मार्गांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या बस, ट्रक, कार, दुचाकींसह अन्य वाहनांचे कर्कश हॉर्न

आणि जुन्या वाहनांचे आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे. यामध्ये वाहनांच्या अचानक ओरडणाऱ्या आवाजामुळे अनेक वेळा अपघात होत आहेत. असे असताना त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. जुन्या वाहनांमुळे सर्वाधिक वायू प्रदूषण होत आहे.

पीयूसी प्रमाणपत्र म्हणजे काय?

वाहनांमुळे कोणत्या ही प्रकारचे प्रदूषण होत नाही, याची हमी देणारे प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसी प्रमाणपत्र होय. ते विशेष तपासणी केंद्रांवर बनवले जाते.

निघणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड या सारख्या वेगवेगळ्या वायूची चाचणी केली जाते. चाचणी नंतर वाहनास पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते.

हे नियम काय सांगतो?

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार, देशातील प्रत्येक मोटार वाहनासाठी (बीएस १, बीएस २, बीएस ३, बीएस ४ तसेच सी एनजी व एलपीजी वाहने) वैध पीयूसी आवश्यक आहे. चारचाकी बीएस ४ वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची वैधता एक वर्षाची, तर इतर वाहनांसाठी तीन महिन्यांची आहे.

PUC
Nagpur : आय...लव्ह...यू...नागपूर ! सौंदर्यीकरण, रोषणाईच्या प्रेमात पडले नागरिक

किती खर्च येतो ?

पीयूसी प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या वाहनांचे शुल्क भिन्न आहे. पेट्रोल आणि सीएनजीच्या दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी प्रदूषण चाचणी शुल्क ८० रुपये आहे. चारचाकी वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र बनवायचे असल्यास १२५ रुपये शुल्क लागते. ते डिझेल वाहनांसाठी प्रदूषण चाचणी प्रमाणपत्राचे शुल्क १५० रुपये आहे.

PUC
Nagpur : DPC ३०० कोटी जाणार परत, स्थगितीचा फटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com