खबरदार, अनधिकृत पार्किंग कराल तर…

टोईंगसाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क; दहा ‘टोईंग व्हॅन’ दाखल
Nagpur traffic rules Additional charge for towing vehicle
Nagpur traffic rules Additional charge for towing vehiclesakal

नागपूर : शहरात दोन वर्षापासून टोईंगची कारवाई होत नसल्याने अस्ताव्यस्त पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय वर्दळीच्या ठिकाणी अनधिकृत पार्किंगही वाढली आहे. यावर उपाय म्हणून आता महापालिकेने वाहतूक पोलिस विभागाला १० टोईंग वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. त्यामुळे अनधिकृत पार्किंग करणाऱ्याला वाहतूक पोलिसांच्या दंडासह अतिरिक्त टोईंग शुल्कही मोजावे लागणार आहे.

शुक्रवारी एका कार्यक्रमात पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., सहपोलिस आयुक्त अस्वती दोर्जे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अपर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, अतिरिक्त आयुक्त दीपक मीना, व्हीआयपीएल डेकोफर्न कन्सोर्टियमचे प्रशांत उगेमुगे, चेतन कायरकर हे उपस्थित होते.

आजपासून कारवाई

शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी ही टोईंग व्हॅन सीताबर्डी, सदर, बजाजनगर, सेट्रल अव्हेन्यू, व्हीएनआयटी रोड, अचरज टावर या परिसरातील बाजारपेठ, हॉटेल्स, शॉपिंग मॉल येथे कार्यरत असतील. टोईंग व्हॅनवर कॅमेरे लावण्यात आले असून त्यामुळे त्यातील पोलिस कर्मचारी किंवा कंत्राटदाराचे कामगार यांच्याकडून गैरप्रकार होण्याची शक्यता कमी होऊन वाद टाळता येतील. वाहनाला टोईंग करण्यापूर्वी चालक हजर असल्यास टोईंग चार्जेस न भरता त्याला नो-पार्किंगचा दंड भरुन वाहन सोडविता येईल. असे न झाल्यास वाहतूक परिमंडळ कार्यालयात येऊन दंड आणि टोईंग चार्जेस भरावे लागेल. रविवारपासून विभागाद्वारे कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

असा होणार दंड

दुचाकी वाहनांसाठी एकूण चार्जेस - ७५९.६० रुपये (पोलिस विभाग दंड, टोईंग शुल्क, मनपा शुल्क, आणि र्टोइंग शुल्कावर १८ टक्के जीएसटी)

चारचाकी वाहनांसाठी एकूण चार्जेस - १०१९.२० रुपये ( पोलिस विभाग दंड, टोईंग शुल्क, मनपा शुल्क, आणि टोईंग शुल्कावर १८ टक्के जीएसटी )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com