Nagpur AccidentSakal
नागपूर
Nagpur Accident : हिंगणा परिसरात भरधाव कारची धडक; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
Hingna News : हिंगणा येथील किन्ही धानोली परिसरात भरधाव कारने धडक दिल्याने ३० वर्षीय अनिल चव्हाण यांचा मृत्यू झाला असून, आरोपी शांतनू राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किन्ही धानोली येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. ही घटना १७ जुलैला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.