नागपूर : दोन्ही डोज घेतले नाही तर प्रवेश नाही

कार्यालये, धार्मिक स्थळी बंधनकारक ः शैक्षणिक संस्था, शहर बसमध्येही ‘नो एन्ट्री’
Vaccination
Vaccination
Updated on

नागपूर : शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, शहर बस व इतर वाहतुकीतही कोविड लसीकरणाचे दोन्ही डोज घेतले नसेल तर ९ नोव्हेंबरपासून प्रवेश मिळणार नाही. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे आदेश काढले. त्यामुळे आता कुठल्याही कामासाठी बाहेर पडण्यासाठी लसीकरणाचे दोन्ही डोज घेणे आवश्यक झाले आहे.

विविध आस्थापनांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना व तिथे येणाऱ्या सर्व नागरिकांना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस बंधनकारक राहतील तर काही ठिकाणी किमान एक डोस आवश्यक आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी जारी केलेला आदेश ९ नोव्हेंबरपासून लागू होईल. आयुक्तांच्या या नव्या आदेशानुसार धार्मिक स्थळी काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांनाही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन डोज आवश्यक करण्यात आले आहे. सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने, धार्मिक यात्रा, उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्याही दोन मात्रा पूर्ण असणे आवश्यक राहील. सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालय, तत्सम संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी, अधिकारी, कामानिमित्त येणारे १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा किंवा किमान पहिली मात्रा बंधनकारक राहील.

Vaccination
थँक्स कॅप्टन कोहली आणि कोच शास्त्री, टीम इंडियाने दिला विजयी निरोप

शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था आदीमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा पूर्ण असणे आवश्यक राहील. सार्वजनिक परिवहन व्यवस्थे अंतर्गत येणाऱ्या महामंडळ, शहर बस वाहतूक, ऑटो, रिक्षा याद्वारे प्रवास करणाऱ्या १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. बाजार व दुकानांमध्ये असणारे मालक व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या असणे आवश्यक आहे. शहरातील विविध भागात पदपाथावर हातठेले व तत्सम प्रकारचे सर्व विक्रेत्यांच्या किमान एक मात्रा झालेली असणे आवश्यक आहे. सरकारी, निमसरकारी व खाजगी आरोग्य संस्थांत कार्यरत सर्वांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या असणे आवश्यक राहील.

लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक

आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यालय, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्याल, सभाल, संमेलन, उत्सवात लसीकरणाचे प्रमाणपत्र फोटो ओळखपत्रासोबत दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. १८ वर्षाखालील मुला-मुलींना वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेतर्फे आकस्मिक तपासणी करण्यात येईल. अनियमितता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Vaccination
भारत-म्यानमार सीमेवर लष्कराला सापडली 250 किलो स्फोटकं

उद्यान, वाचनालयासाठी एक डोज आवश्यक

शहरातील सर्व उद्याने, वाचानलये, अभ्यासिका, मंगल कार्यालय, लॉन, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या सर्व १८ वर्षांवरील नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीची किमान एक मात्रा घेतलेली असणे आवश्यक आहे. शहरातील विविध भागात फूटपाथवरील हातठेले व तत्सम प्रकारचे सर्व विक्रेत्यांना किमान एक डोज आवश्यक आहे.

शहरात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी नवे आदेश काढण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी ९ नोव्हेंबरपासून करण्यात येईल. आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या पथकातर्फे सर्व ठिकाणी आकस्मिक तपासणी करण्यात येईल. अनियमितता आढळयास दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल.

- राधाकृष्णन बी. आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com