Nagpur University : विद्यापीठाचे कॅम्पस ‘२४ बाय ७’ कोरडे

कर्मचाऱ्यांचे हाल : विद्यार्थी, प्राध्यापकांना हाेतोय मनस्ताप
nagpur university
nagpur universitysakal

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील परिसर (कॅम्पस) आणि प्रशासकीय भवनात पाण्याचा ठणठणाट असल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत असून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसर, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत आणि ‘एलआयटी’ परिसर दोन्ही उंच भागावर आहे. त्यामुळे येथे पाणीपुरवठा करणे हे कसरतीचेच काम आहे. कॅम्पसमध्ये पाण्याच्या समस्येमुळेच परिसरात एकही उद्यान नाही.

nagpur university
Nagpur : मोकाट कुत्र्यांचा राजेशाही थाट!

दुसरीकडे अभियांत्रिकी विभागाला अनेक प्रकारचे जुगाड करून विविध विभागांमध्ये पाणीपुरवठा करावा लागतो. कॅम्पसमध्ये झाडांच्या देखरेखीसाठी पाण्याचेही टँकर मागवावे लागतात. विद्यापीठ परिसरात प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यापीठाचे कर्मचारी येतात. ही संख्या हजारावर असते. त्यामुळे टॉयलेट, बाथरुमचा वापर करणेही अवघड झाले आहे.

५ लाख ऐवजी ३ लाखच लिटरचा पुरवठा

विद्यापीठाद्वारे कॅम्पस आणि प्रशासकीय इमारतीसाठी महानगरपालिकेसोबत पाच लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. त्यापैकी केवळ ३ लाख लिटर पाणी दिले जाते. त्यामुळे इतक्या कमी पाण्यात भागवणे विद्यापीठाला अवघड जात आहे.

ग्रीन ऑडिटमध्येही सूचना

येथील पाण्याची समस्येचे वर्षभरापूर्वी विद्यापीठाद्वारे ग्रीन ऑडिट करण्यात आले होते. त्यात परिसरात पाण्याची साठवणूक व जतन करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

nagpur university
Nagpur : लघु उद्योगांना पाच कोटीपर्यंत विनातारण कर्ज

प्रशासकीय भवनातही हाल

विद्यापीठाद्वारे कोट्यवधी रुपये खर्चून कॅम्पसच्या बाजूला मोठे प्रशासकीय भवन तयार केले. मात्र, ते तयार करताना, येथे पाण्याची सोय कशी करणार हा याचा विचार झाला नाही. या प्रशासकीय भवनात विद्यापीठातील अधिकाऱ्यांची कार्यालये, सर्वच विभाग आणि त्यात काम करणारे कर्मचारी समाविष्ट करण्यात येणार आहे. मात्र, कॅम्पसप्रमाणेच येथेही पाण्याची सोय नाही. वेळोवेळी त्यासाठी टॅंकर मागवून काम भागवले जात आहे.

नेमकी काय आहे समस्या?

विद्यापीठाला सध्या अंबाझरी तलावातून पाणीपुरवठा होत आहे. तो फुटाळा तलावातून करावा अशी मागणी आहे. यासाठी तलाव ते कॅम्पसपर्यंत जल वाहिनी टाकावी लागणार आहे. सोबतच यासाठी पंप आणि अन्य उपकरणेही बसवावे लागतील. या संपूर्ण प्रकल्पात विद्यापीठाला सुमारे २५ लाखावर रुपये खर्च येणार होता नाही.

याशिवाय गोरेवाडा येथून होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाडी जलकुंभातून व्हावा यासाठीही विद्यापीठ प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही या दिशेने विद्यापीठाने कुठलेही पाऊल उचललेले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com