.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निलंबित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी त्यांच्यावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करीत आव्हान दिले आहे. यापूर्वी कारणे दाखवा नोटिशीविरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्येच त्यांनी हा अर्ज केला असून उच्च न्यायालयाने तो अर्ज आज मान्य केला. तसेच, विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपालांना तीन आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.