‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे यजमानपद नागपूर विद्यापीठाला

‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन'ने (इस्का) याबाबत अधिकृत निमंत्रण विद्यापीठाला पाठवले.
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universitysakal
Summary

‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन'ने (इस्का) याबाबत अधिकृत निमंत्रण विद्यापीठाला पाठवले.

नागपूर - देशातील सर्वात मोठा वैज्ञानिक सोहळा असणाऱ्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ची १०८ वी परिषद जानेवारी २०२३ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होणार आहे. त्याबाबत विद्यापीठाला अधिकृत पत्र मिळाले आहे. यापूर्वी ही परिषद २०२१ मध्ये पुण्यातील ‘सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी’ येथे घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. कोरोनामुळे ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हे शतकोत्तर वर्ष आहे. त्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातूनच ८ तारखेला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, त्यात इंडियन सायन्स कॉंग्रेसचे यजमानपद मिळाल्याने विद्यापीठाची इतिहासात नोंद होणार आहे.

‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन'ने (इस्का) याबाबत अधिकृत निमंत्रण विद्यापीठाला पाठवले आहे. 'इस्का'तर्फे दर वर्षी देशातील विविध शहरांत 'इंडियन सायन्स काँग्रेस'चे आयोजन करण्यात येते. १९१४ मध्ये सुरू झालेल्या 'सायन्स काँग्रेस'च्या इतिहासात पहिल्यांदाच ही परिषद नागपूरला होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायन्स काँग्रेसचे उद्‍घाटन होणार असून, देश-विदेशातील नामवंत संशोधक, नोबेल विजेते शास्त्रज्ञ या परिषदेला उपस्थित राहतील. देशभरातील सर्व संशोधनसंस्थांचे प्रतिनिधी, विविध विज्ञान विषयांतील शास्त्रज्ञ, विद्यार्थी सायन्स काँग्रेसमध्ये त्यांच्या क्षेत्रात सध्या सुरू असणाऱ्या संशोधनाचे सादरीकरण करतील. 'सायन्स काँग्रेस'च्या निमित्ताने आयोजित होणारे देशातील सर्वांत मोठे विज्ञान प्रदर्शन हे नागपूरकरांसाठी विशेष आकर्षण असेल.

थीमसाठी पुढल्या आठवड्यात चमू विद्यापीठात

९१४मध्ये सुरू झालेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ची परिषद ही वेगवेगळ्या ‘थीम’वर असते. त्यामुळे यावेळी नेमकी कोणत्या ‘थीम’ असेल याबाबत इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन'ने (इस्का)द्वारे पुढील आठवड्यात नागपूर विद्यापीठाला भेट देणार असून यावेळी मध्यवर्ती संकल्पना (थीम) ठरवली जाणार आहे.

विद्यापीठाचा कायापालट होणार

देशातील सर्वोच्च विज्ञान परिषद असल्याने त्या अनुषंगाने विद्यापीठाला मोठे बदल करणे अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षित अशा सुविधांसाठी निधी मिळतो. त्यामुळे विद्यापीठाचा कायापालट होणार आहे. याशिवाय देशात विद्यापीठाचे स्थानही उंचावणार आहे.

विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवात ‘इंडियन सायन्स काँग्रेस'ची परिषदेचे यजमानपद मिळणे ही गौरवाची बाब आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या इतिहासात हे सुवर्णाक्षराने लिहिल्या जाईल.

- डॉ. संजय दुधे, प्र-कुलगुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com