Nagpur: भाजयुमो'ने जय श्रीरामचे नारे देत उधळली बैठक, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी कुठलीही कारवाई न झाल्याने भारतीय जनता युवा मोर्च्या च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी सुरू असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली.
Nagpur: भाजयुमो'ने जय श्रीरामचे नारे देत उधळली बैठक, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

BJUM Nagpur University: युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विनायक दामोदर सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी कुठलीही कारवाई न झाल्याने भारतीय जनता युवा मोर्च्या च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी सुरू असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली. सभागृहात जय श्रीरामचे नारे लावत चांगलाच गोंधळ घातला. यावेळी कुणाल राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत ठिय्या मांडला.

विद्यापीठाची आज गुरुवारी दुपारी बारा वाजता व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू झाली. यावेळी भाजपचे शहर पदाधिकारी आणि अधिसभा सदस्य विष्णू चांगदे आणि भाजयुमो च्या शिवानी दाणी यांच्यासह पन्नासावर कार्यकर्ते सभागृहात शिरले. यावेळी घोषणाबाजी करीत त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

त्यामुळे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी बैठक काही वेळेसाठी स्थगित केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कुलगुरू आणि प्रकुलगुरूंच्या समोर ठिय्या मांडून तत्काळ कुणाल राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (Latest Marathi News)

त्यामुळे तीन तास बैठक खोलंबली होती. काही वेळाने कुलसचिव डॉ राजू हिवसे हे स्वतः तक्रार घेऊन अंबाझरी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनतर त्यावरून कुणाल राऊत आणि त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Nagpur: भाजयुमो'ने जय श्रीरामचे नारे देत उधळली बैठक, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Valentine Day 2024 : प्रेमापुढे वय देखील झुकले, वाचा ‘या' फिटनेस फ्रीक कपलची चिरतरूण लव्हस्टोरी

आंदोलनाला सदस्यांची मुकसंमती

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळण्यात अली असताना त्यासाठी सर्वच सदस्यांची मुकसंमती असल्याचे दिसून आले. यामध्ये राज्यपाल प्रतिनिधी समय बनसोड, वामन तुर्के झ अजय चव्हाण, योगेश भुते, अधिष्ठाता यांनीही जवळपास आंदोलकांचे समर्थन करण्याची भूमिका घेतली. (Latest Marathi News)

विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे बैठक उधळण्यात आल्याचे दिसले. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून त्यांना चहाची व्यवस्था करून देण्यात आली. कुलगुरूंकडूनही अशा व्यवहाराबाबत मौन बाळगण्यात आले.

Nagpur: भाजयुमो'ने जय श्रीरामचे नारे देत उधळली बैठक, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Uttar Pradesh Farmers: युपीचे शेतकरी दिल्लीत आंदोलन का करत आहेत? प्रमुख मागण्या कोणत्या?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com