

Nagpur News
esakal
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल आणि विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गुणपत्रिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या प्रकाराने हजारो विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अधिसभा सदस्य अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करीत तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.