
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘डिजिटल’ विद्यापीठाकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. पीएच.डी. संदर्भात नवी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार विद्यार्थ्याला पीएच.डी. शोधप्रबंधासह सांराशही पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने सादर करता येणार आहे.