

SAKAL ImpactSupplementary English Removed
नागपूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) अंतर्गत भारतीय भाषांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा डंका पिटला जात असताना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मात्र बीए., बी.कॉम, बी.एस्सी या पदवी अभ्यासक्रमांतील पहिल्या आणि चौथ्या सत्रात मराठी भाषेऐवजी ‘सप्लीमेंट्री इंग्लिश’ला स्थान दिल्याचा प्रकार समोर आला होता. या विषयाला लावून धरत ‘सकाळ’ने दिलेल्या लढ्याला यश आले असून विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने चारही शाखांमधून ‘सप्लीमेंट्री इंग्लिश’ला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.