

Valentine Day 2026
sakal
नागपूर : एका कॉन्फरन्स कॉलपासून आमच्या प्रेमाला सुरुवात झाली आणि पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोन भिन्न संस्कृतीच्या आम्ही दोन व्यक्ती एकत्र आलो. एक काळ असा होता की लोक आमच्या मॅडमशी बोलायलाही घाबरायचे. कुठे काही बोलून जातील की काय, अशी भीती असायची आणि आज तिच नेहा माझी सहचारिणी म्हणून माझ्या सोबत आहे. आम्ही दोघं एकाच कंपनीत वेगवेगळ्या विभागात कार्यरत होतो. एका खाजगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत नेहाची (पूर्वाश्रमीची दंदेवार) एक मैत्रीण माझ्य विभागात काम करत होती.