Nagpur News: व्हायरलचा विळखा; नागपूरकर फणफणले ;महिनाभरात आढळले डेंग्यूचे १६० रुग्ण; स्वाईन फ्लूचा आलेखही वाढला

Medical Reports 100 Viral Fever Patients Daily : नागपुरात विषाणूजन्य तापाचे मेडिकलमध्ये दररोज १००, तर मेयोमध्ये ६० रुग्ण आढळत आहेत. ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे १६० आणि स्वाईन फ्लूचे ३८ रुग्ण नोंदवले असून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
 Hospitals in Nagpur are reporting a rise in viral fever, dengue and swine flu patients.

Hospitals in Nagpur are reporting a rise in viral fever, dengue and swine flu patients.

eSakal

Updated on: 

नागपूर : नागपूरकरांना सध्या विषाणूजन्य आजारांनी चांगलेच घेरले आहे. घरोघरी तापाचे रुग्ण आढळत असून मेडिकलमध्ये दररोज व्हायरल फिवरचे १०० तर मेयोत ६० रुग्णांची नोंद होत आहे. शहरात महिनाभरात डेंग्यूचे १६० रुग्ण आढळून आले आहेत. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.

सध्या दिवसा उन आणि रात्री गारवा असे वातावरण विषाणूजन्य तापाला पोषक ठरत आहे. सध्या घरोघरी ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आहेत. यामुळे नागरिकांच्या खिशावरही परिणाम होत आहे. दवाखान्यांमधील गर्दीही वाढली आहे. ग्रामीण भागातील नागरिक उपचारासाठी शहरातील मेयो, मेडिकलमध्ये गर्दी करीत आहेत, तर खासगी रुग्णालयात शहरातील रुग्णांची गर्दी दिसते. परिणामी बसमधून प्रवास करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...