
नागपूर : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रशिक्षण संस्थेने (व्हीएनआयटी) गेल्या दहा वर्षात आपल्या विविध अभ्यासक्रमांच्या शुल्कात तिपटीने वाढ केल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली. आहे. ‘व्हीएनआयटी’ने १० वर्षांत एकूण ५ वेळा शुल्क वाढवण्यात आले आहे. अधिवक्ता संगीता थूल यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात संस्थेने ही माहिती दिली आहे. केंद्रीय शिक्षण विभागांनी वेळोवेळी दिलेल्या पत्रांच्या आधारे ही शुल्क वाढ करण्यात आल्याचा संस्थेचा दावा आहे. संस्थेत सध्या ४८८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. करोना काळात अनेक संस्थांनी शुल्कामध्ये वाढ थांबवली. करोना काळात लोकांचे रोजगार बुडाल्याने काही संस्थांनी शुल्क माफीही दिली आहे. मात्र, व्हीएनआयटीमध्ये दहा वर्षांत तिपटीने शुल्क वाढ झाली आहे.
अशी आहे शुल्कवाढ
बी.टेक.
२०१२-१३ मध्ये बी. टेक. अभ्यासक्रमाचे शुल्क ४१ हजार ८५० होते.
२०१४-१५ मध्ये हे शुल्क ५० हजार १०० रुपये झाले.
२०१५-१६ च्या सत्रात हे शुल्क ९३ हजार ७०० रुपये झाले.
२०१७-१८ च्या सत्रात शुल्क पुन्हा १ लाख ४८ हजार ७०० रुपये करण्यात आले.
२०२०-२१ मध्ये शुल्क वाढून १ लाख ४९ हजार २०० रुपये झाले.
बी.आर्किटेक्चर
२०१२-१३ मध्ये बी.आर्क. अभ्यासक्रमाचे शुल्क ४१ हजार ९३०रुपये होते. शैक्षणिक सत्र २०१४-१५ मध्ये हे शुल्क ५१ हजार ४०० रुपये झाले.
२०१५-१६ मध्ये ९५ हजार रुपये.
२०१७-१८ मध्ये पुन्हा १ लाख ५० हजार रुपये शुल्क वाढवण्यात आले.
२०२०-२१ मध्ये शुल्क वाढून १ लाख ५० हजार ५०० रुपये झाले.
एम.टेक.
२०१२-१३ मध्ये एम.टेक. चे शुल्क ४३ हजार ८५० रुपये होते. २०१४ मध्ये ते ४९ हजार ५०० रुपये झाले.
२०१५ मध्ये हे शुल्क ९३ हजार १०० रुपये झाले.
२०२० मध्ये हे शुल्क वाढवून ९३ हजार ६०० रुपये करण्यात आले.
एम.एसस्सी.
२०१२ मध्ये या अभ्यासक्रमाचे शुल्क १५४५० रुपये होते. २०१४ मध्ये ते २१५०० रुपये झाले.
२०१५ मध्ये ३५१०० रुपये
२०१९ मध्ये ३६६०० रुपये करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.