Nagpur News: गटाराचे पाणी रस्त्यावर; दुर्गंधीने नागरिक बेजार ;प्रभाग २२ मध्ये ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य ; विहीर, बोअरवेलचे पाणीही दूषित

Nagpur Ward 22 Civic Issues : महाल-गांधीबाग झोनमधील प्रभाग २२ मध्ये तुंबलेली गटारे, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी आणि दुर्गंधीयुक्त विहिरींच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. बंद हॅन्डपंप आणि रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळेही स्थानिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Residents of Nagpur's Ward 22 face drainage, water quality and road infrastructure problems.

Residents of Nagpur's Ward 22 face drainage, water quality and road infrastructure problems.

esakal

Updated on: 

चेतन बेले

नागपूर,: महाल-गांधीबाग झोनच्या सभापती उमा देशमुख यांच्या प्रभाग क्र. २२ मध्ये मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे दिसून येत आहे. प्रभागात ठिकठिकाणी गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. एवढेच नव्हे तर घरातील सार्वजनिक विहिरी आणि खासगी बोअरवेलच्या पाण्याचाही दुर्गंधीयुक्त घाण वास येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...