
नागपूर : रेखा धनराज नंदरधने (४४) या सोमवारी सकाळी शेतात भाजी तोडत असताना हाताच्या बोटाला काहीतरी टोचल्यासारखं जाणवले. फक्त एका ठिकाणीच व्रण दिसल्याने काटा रुतला असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. नंतर अस्वस्थ वाटूनही त्यांनी मांत्रिकाकडे उपचार केले. मात्र तीन तासांनी त्यांचा मृत्यू झाला. भिवापूर तालुक्यातील खातीपुरा येथे ही घटना घडल्यावर एक दात तुटलेल्या सापाचा दंश संभ्रम निर्माण करून मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.