
नागपूर : कपिलनगर पोलिस ठाण्यात राहणाऱ्या सुनीता जामगडे कालगिल येथील शेवटच्या गावातून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्या होत्या. २४ एप्रिलला या महिलेला भारताच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर त्यांना अमृतसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आता नागपूर पोलिसांच्या पथकाने महिलेला नागपुरात आणले असून तिच्यावर ३,४,५ या ऑफीशिअल सिक्रेट अॅक्ट १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता महिलेची चौकशी राज्यासह देशातील तपास यंत्रणा करणार असल्याची माहिती पोलिसांच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.