Nagpur Acid Attack : विवाहितेवर ॲसिड हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Acid Attack

Nagpur Acid Attack : विवाहितेवर ॲसिड हल्ला

नागपूर : रस्त्यावरून जाणाऱ्या विवाहितेवर समोरून येणाऱ्या बुरखेधारी बाईकस्वारांनी ॲसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने विवाहिता या हल्ल्यातून थोडक्यात बचावली असली तिच्या कडेवर असलेला अडीच वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी असल्याचे समजते. दोघांवरही मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मात्र, ॲसिड असल्याचा इन्कार केला आहे. लताबाई पुराणिक वर्मा (वय २४), वंश वर्मा (वय २) रा. गल्ली क्रमांक १, विनोबा भावेनगर असे आई आणि मुलाचे नाव आहे.

लताबाई गृहिणी असून तिचे पती व्यवसायाने ड्रायव्हर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी लता यांचे पती पुराणिक बाहेर कुठेतरी गेले होते. त्यामुळे लता सकाळी आठ ते दहाच्या सुमारास आपल्या दोन वर्षाच्या मुलासह घरातून बाहेर पडल्या होत्या. यानंतर वस्तीमध्येच समोरून मोटारसायकलने येणाऱ्या दोन बुरखाधारी व्यक्तींनी त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. यात सुदैवाने लता वर्मा यांना गंभीर इजा झाल्या नसल्या तरी दोन वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर ज्वालाग्राही पदार्थ पडला.

यामध्ये त्याचा चेहरा भाजल्याने तिची प्रकृत गंभीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. लता वर्मा यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आले. लता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्यावर फेकलेला पदार्थ अॅसिड होता की अन्य कोणता पदार्थ होता याचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

जुन्या वैमनस्यातून हल्ल्याची शक्यता

पोलिसांनी लता वर्मा यांची चौकशी केली. हल्लेखोर कोण होता; किती लोक होते हे माहीत नसल्याचे चौकशीत सांगितले. कारण तिने हल्लेखोराला पाहिले नव्हते. दरम्यान, पोलिसांनी या घटनेबाबत अॅसिड हल्ला झाल्याचा इन्कार केला आहे. महिलेला अॅसिडसदृश द्रव पाजून मारण्याची धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वैमनस्यातून ही घटना घडण्याची शक्यता आहे. कशावरून वैर होते, याचा तपास पोलिस करीत आहेत, त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करीत आहे.

अजनीतही घडला होता प्रकार

नागपुरातील रामेश्वर परिसरात कामावर जाणाऱ्या एका महिलेवर २२ जानेवारीला अशाच प्रकारे अ‍ॅसिडसदृश्य द्रव्य फेकून हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यातही दुचाकीवरून जाणाऱ्या इसमाने या महिलेवर अ‍ॅसिड सदृश्य द्रव्य फेकून हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासात तो हल्ला तिच्या पतीनेच केल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आजही तसात प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Nagpurpolicecrime