
नागपूर : शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरील खोदकामामुळे वाहन चालक त्रस्त आहेत. दुसरीकडे पावसाळा येऊनही अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे आणि आशय पाटील या तरुणांनी चक्क खड्ड्यांना श्रद्धांजली वाहून स्वतः खड्डे बुजविले.