Nagpur Accident : टिप्परच्या धडकेत २५ वर्षीय युवकाचा मृत्यू; नागपुरात अपघात
Accident News : नागपूरमधील सक्करदरा उड्डाणपुलावर टिप्परने धडक दिल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी टिप्पर चालकास अटक केली असून, अपघाताचा तपास सुरू आहे.
नागपूर : सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उड्डाणपुलावर टिप्परने मोटारसायकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२९) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.