Nagpur Crime : तक्रार दिल्याने युवकाचा खून; तिघांना अटक, यशोधरानगरात चार दिवसात दोन हत्या
Crime News : वनदेवीनगर, नागपूर येथे एका पोलिस तक्रारीवरून निर्माण झालेल्या वादातून तिघांनी २१ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
नागपूर : पोलिसांकडे तक्रार दिल्याचा कारणाने सातत्याने वाद घालणाऱ्या युवकाचा तिघांनी खून केला. ही घटना वनदेवीनगर चौकात गुरुवारी (ता.२२) दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास उघडकील आली. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक केली.